ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर हुतात्मा स्मारकाला मिळाला सुरक्षा रक्षक

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        हुतात्मा स्मारक भद्रावती हे नशेडीचा अड्डा बनत आहे आणि यावर आवर घालण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य, प्रविण चिमुरकर यांनी काही दिवसापासून हुतात्मा स्मारकाला २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी मुख्याधिकारी नगरपरिषदेकडे केली होती. यावर नगरपरिषद भद्रावती ने दि. १ जुलै पासून २४ तास सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे.

     हुतात्मा स्मारक भद्रावती येथे नशेडी, टवाळखोर तरूण सायंकाळी रोज सिगारेट, यांच्या ओढतांना दिसत होते. गांजा आणि सिगारेट हुतात्मा स्मारकाच्या परिसरात लपवून ठेवतात. काही तरूण जोडपे अनेकदा अश्लील चाळे करतांना दिसल्याचे येथे येणारे नागरिक सांगतात. काही टवाळखोर तरूण चक्क बाईक स्टंट करतांना दिसले. याकडे गांभिर्याने लक्ष देऊन हुतात्मा स्मारकाला २४ तास सुरक्षा रक्षक द्यावा. अशा आशयाची मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य, प्रविण चिमुरकर यांनी नगरपरिषदेकडे केली होती.

याविषयी तप्तरता दाखवत विशाखा शेळकी, मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती यांनी हुतात्मा स्मारकासाठी २४ तास सुरक्षा रक्षकाची दोन शिफ्ट मध्ये नेमणूक केली आहे. यांच्या या निर्णयाचे स्वागत करून हुतात्मा स्मारकाची गरिमा कायम राहून या ठिकाणी नेहमी जनतेच्या हिताचे कार्य घडतील अशी अपेक्षा भद्रावतीकरांकडून केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये