सनराइज योगा ग्रुप तर्फे सेवानिवृत्त शिक्षिकांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
योगा ऍक्टिव्हिटी बेनेफिट वूमन्स ग्रुप तर्फे श्रीमती वैशाली हेपट मॅडम आणि सौ. ज्योती चटप मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांच्या घरी मनःपूर्वक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन सनराईज योगा ऍक्टिव्हिटी बेनेफिट वूमन्स ग्रुप च्या संचालिका कुंतल चव्हाण यांनी केले दोन्ही शिक्षिका यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठा, समर्पण आणि प्रेमाने कार्य करून विद्यार्थ्यांच्या जीवनात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा स्नेहसोहळा आनंददायी आणि भावनिक वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व सदस्यांनी दोन्ही शिक्षिका यांना निरोगी, आनंदी आणि समृद्ध आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम आपुलकी, कृतज्ञता आणि आदराने ओथंबलेला होता. सौ. अनिता हुलके,अर्चना घोटकर, शोभा मोहुर्ले, स्मिता पिदूरकर, भारती राठोड, वैशाली पारधी, पल्लवी इंगोले, पल्लवी सोनटक्के, सुनंदा आदे, आशा धोटे,कल्पना इटणकर, सर्व सनराईज ग्रुप च्या माहिलांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सौ छाया टोंगे यांनी केले तर कुंतल चव्हाण यांनी आभार मानले .



