Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प.पु.मंगेश महाराज यांच्या वाढदिवसानिमित्ताने परिसरात वृक्षारोपण व पंचकोशीतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह खावु वितरण

चिंताहरण कपिश्वर देवस्थान चंदनखेडा (खोकरी) चा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील चंदनखेडा खोकरी, बेलगाव, चरुर (धा) या पंचकोशी परिसरात परमपूज्य श्री मंगेशजी महाराज यांच्या वाढदिवसानिमीत्तांनी पंचकोशी परिसरातील जिल्हा परिषद शाळेंच्या शिक्षकांचा सत्कार व शालेय विद्यार्थांना शालेय साहीत्याचे वितरण तसेच खाऊ वाटप पंडीत सतिश गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा ही विद्यार्थांना ज्ञानदान करणारी, त्यांच्यावर चांगले संस्कार करणारी, कींबहुना त्याचे जीवन घडवीनारी एक सामाजिक संस्था असते म्हणुनस शाळा आणि शिक्षक यांचे ऋण मनुष्य कधीही विसरु शकत नाही ते फेडण्याचे वेग वेगळे मार्ग आहेत.

अशातलाच एक मार्ग निवडुन दरवर्षी भद्रावती तालुक्यातील चिंताहरन कपिश्वर देवस्थान चंदनखेडा (खोकरी) येथील मा.प.पू. मंगेश महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन साधक मंडळी स्वतः जाऊन चंदनखेडा, चंदनखेडा मक्ता, चरूर (धा.), खोकरी, बेलगाव पंचकोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थांन्ना नोटबुक, पेन, पेन्सील, फळे, मिठाई वाटुन वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक परिवर्तनाची जाणीव असलेले माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी रामकृष्ण हनवते, पंडित सतीश गुरूजी, सुरेंन्द्र वांढरे, गणेश बुजाळे, दिनेश सोनुने,दशरथ ठावरी,प्रकाश कंगाले, बबनराव पंधरे, प्रदिप बदकी, ज्ञानेश्वर चौधरी, रमेश भोयर, सुभाष वांढरे, मनोहर महाले,बाळकिशन तामखाने, गोपाल गोंगल, दिलीप,हर्षल महाले, यांनी उपस्थित राहुन मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये