Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंत्यसंस्कारा करीता पार्थीव घेवुन जाणाऱ्या स्काँर्पीओची पुलाला धडक

एकाचा घटनास्थळी मृत्यु तर एक गंभीर

चांदा ब्लास्ट

मूल : चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावांत पार्थीव घेवून जाणा-या स्काॅर्पीओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जानाळा लगतच्या नर्सरी जवळ घडली. अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्यें चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते.

       चंद्रपूर लगतच्या पडोली लखमापूर परीसरातील कोल डेपो मध्यें काम करणारे केशवराम यादव (60) यांचे काल रात्री निधन झाले. छत्तीसगड मधील मानकापूर जिल्हयातील बोहरमभेडी येथील मूळ रहिवासी असल्याने मृतक केशवराम यादव याचे पार्थीव अंत्यसंस्कारा करीता त्याचे मूळ गांवी घेवून जाण्यासाठी त्याचे नातेवाईक छगनलाल साहु व इतर दोघेजण स्काॅर्पीओ (एचएच-34-बीएफ 0050) ने सकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान लखमापूर येथून छत्तीसगड कडे रवाना झाले. दरम्यान सकाळी 9.50 वा. चे दरम्यान मूल पासून चंद्रपूर मार्गावरील 7 कि.मी.अंतरावर असलेल्या जानाळा लगतच्या नर्सरी जवळ स्काॅर्पीओ चालक अश्वजीत रूपचंद सहारे (26) रा. दुर्गापूर याचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने मार्गावरील पुलाच्या कठडयाला स्काॅर्पीओने धडक दिली. अपघातग्रस्त वाहण भरधाव वेगात असल्याने वाहणाच्या धडकेने पुलाचा कठडा तुटून मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली.

यामध्यें गोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगांव तालुक्यातील बुटाई येथील रहीवासी असलेले सचिन मोहन साखरे (32) याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मृतक सचिन साखरे हा स्काॅर्पीओ चालक अश्वजीत सहारे याचा नातेवाईक असून पार्थीव पोहोचवून परत येतांना सोबतीला एक जण असावा म्हणून स्काॅर्पीओ चालकाने त्याला सोबत घेतले होते. अपघाता मध्यें छगनलाल साहु (60) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले. इतर दोघांना किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप आहेत. घटनेची माहिती होताच मूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी आणि मृतकाला हलविण्यात रूग्णवाहीकेला बोलाविण्यात आले.

परंतू रूग्णवाहीकेला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने शेवटी पोलीस वाहणामध्यें जखमी आणि मृतकांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कर्मचारी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये