विवेकानंद महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी शिबीर संपन्न
लोकशाही टिकविण्यासाठी युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंदणी न झालेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी “युवा मतदार नोंदणी शिबिर” घेण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ.विजय टोंगे, डॉ. ज्योती राखुंडे, तहसील कार्यालयातील सुधाकर राऊत, सार्थक रत्नपारखी मंचावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी तहसील कर्मचाऱ्यांनी पात्र विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनींचे मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले.
लोकशाही टिकविण्यासाठी युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या शिबिराचे संचालन प्रा. अमोल ठाकरे, प्रास्ताविक नोडल अधिकारी डॉ. विजय टोंगे, आभार डॉ. उत्तम घोसरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील डॉ. सुधीर आष्टुनकर,डॉ. प्रकाश तितरे, डॉ. गजानन खामनकर, डॉ.सुहास तेलंग, डॉ. जयवंत काकडे, डॉ. रमेश पारेलवार,प्रा संगीता बांबोडे, डॉ यशवंत घुमे यांच्यासहविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.