Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथे दिनांक 29 ऑगस्ट 2023 हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त महाविद्यालयात फिट इंडियाची शपथ घेऊन विविध खेळाचे आयोजन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. रवी धारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन कावडकर यांनी केले.

यावेळी मेजर ध्यानचंद प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संतोष गोहकार होते तर प्राध्यापक मंगेश जमदाडे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संतोष गोहकर यांनी मेजर ध्यानचंद त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. त्यानंतर फिट इंडिया ची शपथ घेण्यात आली. त्यानंतर लगेच दोरीवरच्या उड्या, चमच्या गोडी, लंगडी या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन कावडकर यांनी केले तर आभार प्रा. गणेश सुरजुसे त्यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये