Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

मृतदेह घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या अपघातात दुसऱ्याचा मृत्यु – छत्तीसगड राज्यात नेण्यात येत होता मृतदेह

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

 आज मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास चंद्रपूर येथुन छत्तीसगड राज्यात एका इसमाचा शवविच्छेदन केलेला मृतदेह नेणाऱ्या MH 34 BF 0050 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाचा मुल जवळील जानाळा गावालगत असलेल्या नाल्याच्या पुलाला धडकल्याने वाहनातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन लहान रपट्याच्या पुलाला धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की वाहनातील एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक इसम गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती कळताच मुल पोलीस घटनास्थळी पोहचले असुन त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने जखमी इसमाला वाहनातून बाहेर काढले व  त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये