गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फिर्यादीची तक्रार – ऑनलाईन पैसे वळते करण्यास भाग पाडून फसवणूक

एकुण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त - पुढील तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी कु. चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही, वय २८ वर्षे व्यवसाय सिनी लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी (मेघे) यांना आरोपी मो.क. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगुन त्यांचे नावाचे पार्सल मध्ये ०२ किलो कपडा, ५ पासपोर्ट, ६ केडीट कार्ड व १४० ग्रॅम एम.डी. हे अंमली पदार्थ पकडले असल्याचे सांगुन त्याकरीता १६,२५०/- रू चे पेमेंन्ट त्यांचे आय.डी. वरून पाठविले असे सांगुन मुंबई पोलीस सायबर क्राईम या नावाने स्काईप वरून कॉल करून, भिती दाखवुन २,४७,७७६/- रू ऑनलाईन वळते करण्यास भाग पाडुन फसवणुक केली. अशा आशयाचे फिर्यादींचे लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन, वर्धा येथे दि. २७.०६.२०२३ रोजी अप क ०१ / २३ कलम ४१९, ४२० भा.द.वि. सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास करून गुन्हयात आरोपी अंबादास जनार्धन कांबळे, रा. रा. नांदेड, व अनिल संभाजी पाटील, रा. औरंगाबाद यांना दि. १८.०८.२०२३ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली होती.

सदर गुन्हयाचे पुढील तपासात तांत्रीक विश्लेषणावरून प्राप्त माहितीचे आधारे गुन्हयाचे तपास कामी पथक सुरत (गुजरात) येथे रवाना करण्यात आले होते. सदर ठिकाणी तपास करून गुन्हयात आरोपी ०१) अजय दत्तु पाटील, रा. सुरत, (गुजरात) ०२) पृथ्वीश शिवाभाई मावाणी, वय २१ वर्षे रा. सुरत (गुजरात) यांना दि. २६.०८. २०२३ रोजी गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे ताब्यातुन ०५ मोबाईल व ईतर याप्रमाणे एकुण ८०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदयस्थिती आरोपींचा दि. ३०.०८.२०२३ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे. गुन्हयात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. कांचन पांडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, वर्धा, पोलीस अंमलदार पो. हवा./ वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रणजित जाधव, पो.ना. / अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, लेखा राठोड, प्रतिक वादीले यांनी केली.

(कांचन पांडे )

पोलीस निरीक्षक

सायबर पोलीस स्टेशन, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये