Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राखी अभियानाद्वारा चंद्रपुरातून मुख्यमंत्र्यांना पाठविणार दहा हजार राख्या!

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचा अनोखा उपक्रम “नको ओवाळणी,नको खाऊ, जुनी पेन्शन द्या, एकनाथ भाऊ!”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यावर्षी दिनांक २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत “OPS राखी अभियान” राबवीत आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील महिला कर्मचारी भगिनी, पुरुष कर्मचाऱ्यांची पत्नी व बहीण मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना पाठवून ओवाळणीच्या स्वरूपात आमचं जीवन सुरक्षित करण्यासाठी जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सरकारकडे करणार आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असून, अन्यायकारक डीसीपीएस/ एनपीएस योजना बळजबरीने लादण्यात आली आहे. तेव्हापासून राज्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलन, मोर्चे, पायी दिंडी, उपोषण यांच्या माध्यमातून लढा देत आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे लढ्याला अद्यापही यश प्राप्त झालेले नाही.
त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधत जनतेच्या मनातील शासनाला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे साकडे राज्यातील महिला पेन्शन फायटर्स करणार आहेत. यंदा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून जुनी पेन्शनच हवी असा हट्ट महिला कर्मचारी भगिनी सत्ताधारी भावांना करणार आहेत अशी माहिती श्री. लखन साखरे जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर यांनी दिली.
“राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे भाऊ म्हणून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पेन्शनची ओवाळणी मागण्यासाठी राखी हे प्रतीक मानून पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. भाऊ म्हणून बहिणीच्या रक्षणार्थ साथ देतील, अशी अपेक्षा आहे.”
पोर्णिमा तागडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, चंद्रपूर
“महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी समिती नेमली होती, या समितीला नुकतीच मुदतवाढ देण्यात आली परंतु निर्णय झालेला नाही. या अभियानाद्वारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांना जुन्या पेन्शनची मागणी केल्या जाणार आहे. तेव्हा प्रत्येक महिला कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या पत्नी व मुलींनी यात सहभाग घ्यावा.
विपिन धाबेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये