ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ रस्त्याचे 44 लाखाचे काम ; 2 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच कमिशन साठी फोडला रस्ता

भ्रष्टाचार बंद करण्यासाठी करण्यात येईल आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेवेशी नम्र निवेदन आहे की गर्जना चौक ते पँथर चौक हा रस्ता मुख्य रस्ता आहे. ह्या रस्त्याची स्तिथी अत्यंत दयनीय होती. त्यांनतर ह्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. सुमारे 44 लाखाचे काम होते. ह्या डांबरीकरण केलेल्या रस्त्याला 2 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच कमिशन साठी रस्ता फोडण्यात आला व यावर सिमेंटिकरण करण्याचे काम करत आहे. जवळ जवळ दीड दोन कोटीचे हे काम असून ह्या सिमेंटिकरण ची कोणतीही गरज न असता कमिशन पोटी हे कृत्य करण्यात आले असून असे स्पष्ट चित्र दिसते. जेव्हा डांबरीकरण करण्यात आले होते.

तेव्हा भरपूर प्रमाणात नागरिकांच्या जीवाला व वाहनाला धोका होता हेच चित्र आता त्या गर्जना चौक ते पँथर चौक या रस्ता बांधकामात दिसत आहे. काही दिवसापहिले एक चारचाकी वाहन फोडलेल्या रस्त्यात जाऊन फसले वाहन चालकाच्या सतर्कतेने जीवितहानी टळली. मात्र नगरपरिषद वर्धा शहरातल्या बेकार झालेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष्य करून हे चांगले रस्ते फोडून यावर कमिशन साठी नवीन रस्ते तयार करण्याचा धंदा सुरू केला आहे. ही वर्धा नगरपालिका भ्रष्ट झाली असून याच्यावर जिल्हाधिकारी यांनी स्वतः लवकरात लवकर लक्ष देऊन यांचा हा धंदा बंद करण्यात यावा. एकीकडे देशाचे प्रतप्रधान घोषणा करतात ना खाउंगा ना खाने दुगा मात्र वर्धा नगरपालिका ही वर्धा शहरच्या जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करत आहे असा आमचा आरोप आहे. गर्जना चौक ते पँथर चौक हा सदर रस्ता कशासाठी इतक्या लवकर फोडण्यात आला व यावर सिमेंटिकरण करण्याची कोणती इतकी गरज पडली याचे त्वरित उत्तर प्रशासनाने लेखी द्यावे व येत्या काही दिवसात उत्तर मिळाले नाही तर युवा: परिवर्तन की आवाज संघटना वर्धेच्या जनतेला सोबत घेऊन ह्या नगरपालिका वर्धा चे भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहणार.

सदर निवेदन नायब तहसीलदार चार्ज वर असणाऱ्या आळंदे मॅडम ला देण्यात आले. निवेदन देताना वर्धा जिल्हाध्यक्ष प्रितेश इंगळे, सोनू दाते, अमित भोसले,दिनेश देवतळे, रोहित कडू, दिनेश परचाके, तेजस खडसे, वृषभ मेंधुले, कल्पक मिसाळ, अभिषेक मानकर, इर्शाद शहा, अक्षय बाळसराफ, अमन नारायने व अन्य. उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये