ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘एड्स’ बाबत युवा पिढीला जागृत करणे गरजेचे – विजय ओझा 

रेड रिबिन क्लबचा उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वायगांव: ‘एड्स रोगाचे रूग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. असुरक्षित शारिरीक संबंध हे या रोगाचे महत्त्वाचे कारण असून अनेकजण बळी पडत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे एड्स बाबत युवा पिढीला जागृत करणे हाच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘रेड रिबिन क्लब’ द्वारा आयोजित कार्यक्रमात 24 ऑगस्ट रोजी स्थानिक यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात विजय ओझा यांनी केले.

स्थानिक यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व रोव्हर्स-रेंजर्स पथकाच्या वतीने ‘एड्स नियंत्रण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय ओझा, सुचिता बोभाटे, रेड रिबिन क्लबच्या कार्यकर्त्या संध्या म्हैसकर व उज्ज्वला भोयर उपस्थित होत्या.

आपल्या प्रास्ताविकात सुचिता बोभाटे म्हणाल्या एड्स या रोगाबाबत समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज असून हा विषय लपविण्याकडे अनेकांचा कल आहे. एड्स बाधित रुग्णांचे निदान न झाल्यास त्यांच्या मित्रमैत्रिणींना बाधा होण्याचा मोठा धोका आहे. म्हणुनच युवावर्गात याबाबत जागृती करणे गरजेचे आहे.

अध्यक्षीय भाषणात कॅप्टन मोहन गुजरकर म्हणाले आपल्या वर्धा सारख्या लहान शहरात व जिल्ह्य़ातील दर महिन्याचा एड्स बाधितांचा आकडा धक्कादायक असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब सर्वांकरीता चिंताजनक आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियानाची गरज असून हे काम फक्त तरूण वर्गच यशस्वीरित्या पुर्ण करू शकतात.

कार्यक्रमाचे संचालन एन.एस.एस.चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शैलेन्र्द निकोसे तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश भोमले यांनी केले.

यशस्वीतेकरीता रोव्हर विभाग प्रमुख प्रा. विनोद मेंढे, प्रा. रुपाली तडस व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये