ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा द्वारे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

शिबिराचा दुसरा दिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक २४/०८/२०२३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्यातील प्रवासी बस चालक यांचे करिता निशुल्क नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सद्यस्थितीत राज्यात होणाऱ्या गंभीर अपघातात बसेसच्या अपघातामध्ये होणारी जीवितहानी सर्वाधिक आहे. चालकाच्या संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दृष्टी अनन्यसाधारण महत्त्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी असेल तर वाहन चालविताना अडचणी निर्माण होतात, परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अपघाताच्या सूक्ष्म निरीक्षणात चालकाचे आरोग्य, नेत्रदोष असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत त्यामुळे अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बस चालकांची आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून दृष्टीदोष असणाऱ्या बॅच धारक चालकांना निशुल्क चष्म्याचे वितरण केले जाणार आहे.

सदर शिबिरात एकूण १६७ वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.* आजच्या संपूर्ण शिबिराचे कामकाज डॉ. खुबनानी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात करण्यात आले.

नेत्र चिकित्सा तपासणी करण्याकरिता डॉ.मनोज सक्तेपार यांच्या मार्गदर्शनात अनिल वरघट, अश्विनी गावंडे, किशोर मेश्राम व प्रफुल काकडे यांनी काम पाहिले तर NCD विभागात डॉ. माधुरी निमसटकर यांच्या मार्गदर्शनात गीता लाडे,मंजुषा पाटील, मितला गोहाडे माधुरी लोखंडे, अश्विनी आसुटकर वैशाली साबळे सुकांत येसनकर कृष्णा ताटे यांनी काम पाहिले.
सदर शिबिराच्या यशस्वी ते करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर निरीक्षक मेघल अनासाने, तुषारी बोबडे, गोपाल धूर्वे, साधना कवळे विशाल मोरे, सहायक मोटर निरीक्षक मंगेश राठोड अनुराग सालंकर विशाल भगत निखिल कदम अमर पखान आदित्य ढोक श्रीकांत येवले, लिपिक श्री सुनील शिरसाठ,रामेश्वर इंगोले, संदीप घोडे,शाम संगारे, वाहन चालक पांडुरंग वाघमारे घनश्याम टिकस नरेंद्र तिवारी यांनी परिश्रम घेतले.

याव्यतिरिक्त दिनांक दिनांक २५ व २६/०८/२०२३ रोजी उपजिल्हा सामान्य रुग्णालय हिंगणघाट येथे आणि दिनांक २५/०८/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे याद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा,जिल्ह्यातील सर्व प्रवासी बस चालक यांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये