ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वायगांव निपाणी येथे रस्त्यावर पाणी साचल्यामूळे वाहतुकीला अडथळा निर्माण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

तीन दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे वायगांव निपाणी येथील वार्ड नंबर 4 मधील नागरिक त्रस्त असून पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाणी साचले असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून डेंग्यू,मलेरिया, साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या अगोदर वायगांव निपाणी येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक व पोलिस पाटील यांना सुध्दा अनेक वेळा नागरिकांकडून पाठपुरावा करून निवेदन देण्यात आले असल्याचे येथील स्थानिक रहिवाशी सांगतात.

मात्र, अजूनपर्यंत कोणीही लक्ष दिले नसल्याने परिसथिती जैसे थे, असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महत्त्वाची बाजू अशी आहे की, बस स्थानकाच्या बाजूला गावालगत तलाव आहे. पावसामुळे तलाव भरलेले असून काही ठिकाणी पाझर फुटला आहे.त्यामुळे साचलेले पाणी सुध्दा घरामध्ये शिरल्या जाते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील स्थानिक जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले साहेब यांना भेट देऊन निवेदन सादर करनार असल्याचे विजय हातमोडे व ग्रामस्थांनी सांगितले. वार्ड नंबर ४ मधील ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावून साहेबांनी या गोष्टी लक्षात घेऊन वायगांव निपाणी येथील निवासस्थानी नागरिकांना त्यांच्या समस्या समजून नागरिकांना न्याय मिळवून देण्यात येईल अशी आशा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये