ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक छायाचित्र दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

आ. जोरगेवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील जेष्ठ छायाचित्रकारांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार

चांदा ब्लास्ट
छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे जागतिक छायाचित्र दिवसाचे औचित्य साधून भव्य रॅली, जेष्ठ छायाचित्रकारांचे सत्कार, छायाचित्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कार्यक्रम  मोठ्या उत्साहात पार पडला.
ह्या सोहळ्याची सुरुवात भव्य  रॅलीने जटपुरा गेट – गांधी चौक – जटपुरा गेट अश्या मार्गक्रमाणे शेकडो छायाचित्रकारांच्या सहभागाने मोठ्या उत्सहात पार पडली.
यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालाय  सभागृहात कार्यकमाचे अध्यक्ष मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार, प्रमुख पाहुणे संजय वैरागडे, मुख्य प्रबंधक, वेकोली चंद्रपूर क्षेत्र, संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे, प्रफुल अल्लूरवार डायरेक्टर रसेती, मार्गदर्शक छायाचित्रकार गोलू बाराहते, विकास गोठे, नंदू सोनारकर आणि ज्येष्ट छ्याचित्रकार यांच्या हस्ते पार पडला या वेळी शहरातील व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने छायाचित्ररांच्या उपस्तीथी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विपीन राऊत यांनी संस्थेचा लेखाजोखा सादर केला. छ्याचित्रकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे यांनी छायाचित्रकारांना शुभेच्छा देत आपल्या भाषणात संस्थेचे विविध उपक्रमाबाबत माहिती दिली आणि छायाचित्रकारांच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी प्रकरशाने मांडल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवर यांनी जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देत मी छ्याचित्रकारांच्या नेहमी सोबत राहून आपल्या समस्यांचे निराकरण करेन असे आश्वासन दिले. आम्हा नेत्यांना समोर दाखविण्याचे काम आपण छायाचित्रकारच करतात. समाजातील चांगल्या वाईट गोष्टीं दाखवण्याचा आपण आरसा आहात तसेच आठवणींचा ठेवा जपणारे छायाचित्रकारांचा समाजाला नेहमीच आवश्यकता आहे असे वक्तव्य केले.
   यानंतर प्रमुख अतिथी यांची भाषणे पार पडलीत यावेळी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील जेष्ठ छायाचित्रकारांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यात ज्येष्ठ छायाचित्रकार
1) विश्वनाथ साटोणे वरोरा
2)गणेश चलमेलवार चंद्रपूर
3)विजय गोंगले सावली
4) मुकेश मोगरे चंद्रपूर
5) नरेंद्र एलचपूरवार  पोम्पूर्ण
6) अविनाश दोरखंडे राजुरा
7) बालेश्वर बंडारवार भद्रावती
 8)अण्णाजी वसाके चिमूर
व त्याच प्रमाणे गगुवन्त विद्यार्थी
1) तनवी कुंदन लांडे
2) प्रत्युष नरेश बुरुडकर
3) राधिका अविनाश दोरखंडे  यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच छायाचित्रणाच्या क्षेत्रात विशेष कार्य करनाऱ्या देवा बुरडकर आणि प्रीतम खोब्रागडे या छायाचित्रकारांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला विशेष सहकार्य करणारे छायाचित्रकार आणि चंद्रपूर तालुका छायाचित्रकार समिती यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला
     यावेळी सभागृहात पोस्ट ऑफिस  द्वारे इन्शुरन्स कॅम्प लावून अनेक छायाचित्रकार बंधूनी १० लाखाचा अपघाती विमा काढून घेतला, तसेच IRCTS चे डायरेक्टर मा. प्रफुल अल्लूरवार यांचे कडून प्रशिक्षण आणि लोन प्रक्रिये संदर्भात माहिती देण्यात आली. याप्रसंगी छायाचित्रकार अभिजित नरखेडकर यांचे फोटोग्राफी बिझनेस कसा करायचा ह्यावर मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर व आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव फुलचंद मेश्राम यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता तालुका समिती संभाजी येरगुडे, विजेंद्र गोटफोडे, नरेश वनकर, विशाल गायधन, निकेश चंदेल तसेच टिंकु खाडे, अमोल गायधने, विकास जुमडे, योगेश हुळ, सचिन कडस्कर, गुलशन सावं,  माहिश डहाके आदी छायाचित्रकार यांनी परिश्रम घेतले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये