Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त गुणवंतांचा सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

लोहशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रम १९ ऑगस्टला सावली येथे घेण्यात झाला. कार्यक्रमाची सुरवात संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आली. प्रस्तावना वाचन गजानन आलेवार यांचेकडून करण्यात आले.

स्वागतगित श्रध्दा बोटकावार आणि त्यांचा संचाकडून गायले गेले. अण्णाभाऊना अभिप्रेत असलेल्या कामगार, कष्टकरी लोकांचा सत्कार करण्यात आला. दीड दिवस शाळेत जाऊन अण्णाभाऊ साठेनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा ही त्यांची कादंबरी जगप्रसिद्ध झाली. मोठमोठ्या विद्यापीठात कथा कादंबऱ्या अभ्यासक्रमात शिकविल्या जातात. त्यांनी रशियात जाऊन पोवाडा गायीला.. फुले, शाहू, आंबेकरांच्या विचारावर चालावे आणि समाजाची प्रगती साधावी असा एकंदरीत वक्त्यांचा सुर निघाला.

“जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव” असा संदेश अण्णाभाऊ साठेनी दिला. मादगी समाजातील दहावी- बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला, त्याचबरोबर समाजातील कष्टकरी कामगार, शेतकरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हे विशेष. यावेळी मंचावर प्रमूख पाहुणे म्हणुन किशोर नगराळे, लक्ष्मण मोहूर्ले, गोपाल रायपुरे, रविंद्र बोलीवार, कविता बोलिवार, हिरालाल भडके, आकाश आलेवार, रमेश लाटेलवार, अनिल बोटकावार, केशवराव लाटेलवार, चंद्रहास इटकलवार, विजय देवतळे, बबन गोरंतवार, किशोर पगडपल्लीवार, कालिदास लाटेलवार स्वप्निल पगडपल्लीवार, रुपचंद लाटेलवार तर अध्यक्ष स्थानी धम्मराव तानादू होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल बोटकावार यांनी केले. सूत्र संचालन अविनाश रामटेके तर आभार प्रदर्शन मायाताई मोहुर्लेनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये