Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

आता एक्सिडेंट होता कामा नये,आत्मनिर्भर भारताचे निर्माण करू

चांदा ब्लास्ट :

अवघ्या काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.असे असतांना भारतीय जनता पार्टीने रविवारी घरचलो अभियानाला चंद्रपूरातून सुरवात केली.भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकुम येथील जनतेशी संवाद साधून या अभियानाचा शुभारंभ केला.मागच्या निवडणुकीत एक्सिडेंट झाला,परंतु आता होता कामा नये.त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणूक होत पर्यंत शेवटच्या माणसापर्यंत मोदी सरकारने केलेली कामे पोहोचवावी.आपण सारे मिळून आत्मनिर्भर भारताचे निर्माण करू या,असे आवाहन त्यांनी रविवारी चंद्रपूर येथे केले.


यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रा)हरीश शर्मा,जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे,माजी आ.ऍड.संजय धोटे,सुदर्शन निमकर,भाजपा नेते विजय राऊत, प्रमोद कडू,देवराव भोंगळे,डॉ.मंगेश गुलवाडे,इंजि.सुभाष कासंगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे,प्रकाश धारणे,राजू गोलीवार,विशाल निंबाळकर,सुरज पेदुलवार,प्रज्वलंत कडू,सुनील डोंगरे,शीला चव्हाण,किरण बुटले,विवेक बोढे धनराज कोवे,रूद्रनारायण तिवारी,विठ्ठल डुकरे,दिनकर सोमलकर,रवी लोणकर,सचिन कोतपल्लीवार,संदीप आवारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

*मतरुपी कर्जाची परतफेड आवश्यक*

जनतेनी आम्हाला निवडून दिले त्यांचे मतंरुपी कर्ज लोकप्रतिनिधींवर असते.त्याची परतफेड आपण केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा देऊन केला पाहिजे.म्हणूनच मोदी सरकारने मागील 9 वर्षात केलेली जनहिताची कामे जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे.या मतदार संघातील शेवटच्या माणसाला हिशेब द्या.2047 पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल.यासाठी लोकांनी 2024 ला पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करावे.असे आवाहन त्यांनी केले.

*आ.बावनकुळेंनी घेतला प्रतिष्ठित नागरिकांचा आशीर्वाद*

लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपाला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा ही एकमात्र जागा गमवावी लागली.त्यामुळे आता पुन्हा धोका नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगरातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेऊन आशीर्वाद घेतला.यात प्रामुख्याने इतिहास संशोधक व आंबेडकर चळवळीचे नेते वी.डी.मेश्राम व कुणबी समाजाचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ सातपुते यांचा समावेश होता.

*आर्किटेक्ट ऑफ न्यु इंडिया पुस्तकाचे वितरण*

यावेळी आ.बावनकुळे यांनी,मोदींच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा हिशेब पुस्तक स्वरूपात घरो घरी जाऊन दिला.यात ना.सुधीर मुनगंटीवार लिखित आर्किटेक्ट ऑक न्यु इंडिया पुस्तकाचा समावेश होता.या पुस्तकात मोदींच्या 59 महत्वपूर्ण कामांचे क्यू.आर.कोड देण्यात आले आहे.ते स्कॅन केल्यावर लोकांना यु ट्यूब लिंक द्वारे पूर्ण माहिती प्राप्त होते.

*वडेट्टीवारांचे वक्त्यव्य कायदा व सुव्यवस्था बिगडविणारे*

यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपा दंगली घडविणार असे वक्तव्य केले आहे.त्यांचे हे वक्तव्य कायदा व सुव्यवस्था बिगडविणारे आहे.त्यांना मिळालेले पद संवैधानिक पद आहे.अश्या पदावर असताना बोलण्याचे भान ठेवले पाहिजे.त्यांचे कडे दंगलीची माहिती असेल तर,त्यांनी ती शासनाला द्यावी.त्याची शहानिशा करू.काल त्यांचा सत्कार झाला.काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलले.पण असे कपोलकल्पित बोलणे योग्य नाही.समाजात तणाव निर्माण होईल,असे जवाबदार नेत्याने बोलू नये.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये