गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
७१ गोवंशीय मुकाट जनावराची सुटका – ८ चारचाकी वाहने जप्त ; १४ आरोपी अटकेत
गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक करणार्यां विरुध्द धडक मोहीम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हयातुन अवैध गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी दिनांक 18/08/2023 रोजी जिल्हयात ठिकठिकाणी विशेष नाकेबंदी राबवुन केलेल्या धडक मोहिमेत पोलीस स्टेशन शेगांव (बु.). पोलीस स्टेशन कोठारी, गोंडपिपरी आणि पोंभुर्णा हद्दीत प्रभावी नाकेबंदी दरम्यान गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या एकुण 8 वाहनांविरुध्द कार्यवाही करुन 4 गुन्हयाची नोंद केली असुन त्यात एकुण नग 71 मुकाट गोवंशीय जनावरांची सुटका करुन एकुण 14 आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.
1) पोलीस स्टेशन शेगांव हद्दीत वरोरा ते चिमुर रोड वरील मौजा खातोडा रोडवर नाकेबंदी दरम्यान महिन्द्रा पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 26 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जातांना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) बिलाल जाकीर कुरेशी वय 18 वर्ष रा. भद्रावती ( 2 ) अब्दुल नाजीम अब्दुल कुरेशी वय 28 वर्ष, (3) रितीक सावंत मेश्राम वय 23 वर्ष, (4) राजेंद्र भाऊराव सोयाम वय 55 वर्ष आणि ( 5 ) नेहाल राजेंद्र सोयाम वय 26 वर्ष चारही रा. वरोरा यांना अटक करुन त्यांच्या ताब्यात महिन्द्रा पिकअप क. MH34-BG-1632 किंमत 6,00,000/- रुपये, पायलटींक करीता वापरलेली मोटार सायकल क. MH34-BL-5313 किंमत 30,000 /- रुपये आणि 26 नग गोवंशीय जनावरे किंमत 3,29,000 /- रुपये असा एकुण 9,59,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
2) पोलीस स्टेशन कोठारी हददीत मौजा देवई फाटा रोडवर नाकेबंदी दरम्यान पिकअप वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 08 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जात असतांना मिळुन आल्याने सदर वाहन पिकअप क. MH34- AK-4148 किंमत 3,00,000/- रुपये आणि 08 नग गोवंशीय जनावरे किंमत 80,000/- रुपये असा एकुण 3,80,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
3) पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीत मौजा चिंतलधाबा केमारा रोडवर नाकेबंदी दरम्यान दोन बोलेरो वाहन आणि एक टाटा योध्दा वाहन असा एकुण 3 वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 27 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जातांना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने बोलेरो वाहन क. MH33-T-3729 किंमत 8,00,000/- रुपये, एक टाटा योध्दा वाहन क. MH34-BG-8978 किंमत 8,00,000/- रुपये, बोलेरो वाहन क. MH32-AJ-4180 किंमत 8,00,000/- रुपये आणि 27 नग गोवंशीय जनावरे किंमत 2,70,000/- रुपये असा एकुण 26,70,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
4) पोलीस स्टेशन गोंडपिपरी हद्दीत मौजा विठठलवाडा ते भंगाराम तळोधी रोड वर नाकेबंदी दरम्यान बोलेरो मॅक्स वाहनाची झडती घेतली असता त्यात एकुण 10 नग गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जातांना व जनावरांना कोंबुन दाटीवाटीने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे (1) मधु सानप देवया रा. राजमपेठ जि. मंचेरीयल, (2) राजन्ना मलया कोटे वय 52 वर्ष, (3) अंजी राजन्ना कोटे वय 22 वर्ष दोन्ही रा. केनेपल्ली जि. मंचेरीयल, (4) परमेश मलया गोरे वय 34 वर्ष रा. लक्ष्तीपेठ जि.मंचेरीयल, (5) रामन्ना नरसया मुत्ते वय 40 वर्ष रा. केनेपल्ली जि. मंचेरीयल आणि ( 6 ) राजया राजालिंगु गोल्ला वय 57 वर्ष रा. ईटक्याल जि. मंचेरीयल यांना अटक करुन त्यांच्या ताब्यातील बोलेरो मॅक्स वाहन क. AP22- Y- 7491 किंमत 3,00,000/- रुपये, बोलेरो पिकअप वाहन क. TS19-T-3744 किंमत 300,000/- रुपये आणि 10 नग गोवंशीय जनावरे किंमत 1,00,000/- रुपये असा एकुण 7,00,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शेगांव चे ठाणेदार सपोनि अविनाश मेश्राम, पोलीस स्टेशन पोंभुर्णा चे ठाणेदार मनोज गदादे, पोलीस स्टेशन कोठारी चे ठाणेदार विकास गायकवाड, पोलीस स्टेशन गोंडपिपरीचे ठाणेदार जिवन राजगुरु तसेच पोउपनि महेश सुरजुसे, सफौ भिमराव पडोळे, पोहवा मदन येरणे, गणेश मेश्राम, पोना निखील कौरासे, संतोष निशाद, पोअं प्रफुल्ल कांबळे पोलीस स्टेशन शेगांव (बु.) पोउपनि श्रीकांत कल्लेपल्लीवार, पोहवा आत्राम, पोना राजकुमार चौधरी, पोअं अविनाश झाडे, अरविंद झाडे पोलीस स्टेशन पोंभुर्णा, पोहवा किशोर मांडवगडे, पोअ सचिन पोहनकर, प्रविण कडुकर, हरी नन्नावरे, अमलेश पोलीस स्टेशन कोठारी, पोअ. प्रेम चव्हाण, तिरुपती गोडशेलवार पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांनी केली आहे.