ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे UPSC, MPSC व इतर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युकांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक १२-०५-२०२४ रोजी वर्धा जिल्हा पोलीस दलाकडून मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतून UPSC, MPSC व इतर स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी पोलीस मुख्यालय, वर्धा येथील आशीर्वाद सभागृह येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरामध्ये UPSC 2023 मध्ये उतीर्ण होवून वर्धा जिल्हयाचे नावलौकीक करणारे वर्धा जिल्हयातील श्री अभय डागा हे उपस्थीत होते व श्री राहुल चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव हे उपस्थीत होते.

सदर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरामध्ये श्री अभय डागा व श्री राहुल चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव यांनी उपस्थीत विद्याथ्र्यांना स्पर्धा परिक्षेकरीता उपयुक्त असे मार्गदर्शन केले व त्यांचेषी संवाद साधला तसेच यापुढे सुध्दा जिल्हातील युवकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येईल.

सदर कार्यक्रमाचे यशाकरीता मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. राहुल चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, राखीव फौजदार बानमारे, पोलीस अंमलदार निलेश कट्टोजवार, अक्षय राउत, गोविंद मुंडे व महिला पोलीस अंमलदार स्मिता महाजन तसेच पोलीस मुख्यालय येथील अंमलदार यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. सदर मार्गदर्शन शिबीराकरीता एकुण ३०० विद्यार्थी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये