Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रकल्पग्रस्तांनी रोखली लाईमस्टोन खानीची वाहतूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर

कोरपना – आरसीसीपीएल सिमेंट कंपनी अंतर्गत कोरपना तालुक्यातील परसोडा येथे चुनखडीची नवी खान सुरू करण्यात आली. या खानीचे कंपनी संबंधी विविध मागण्यासाठी सहा महिन्यापूर्वी परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी काम बंद पाडले होते. दरम्यान गुरुवारी हे काम पुनच एकदा आर सी सी पी एल कंपनीने सुरू केले. याच दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी कंपनीची वाहतूक रोखून धरली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतुकीला केला जाणारा अडथळा लक्षात घेता पोलिसांनी नऊ आंदोलकांना स्थानबद्ध केले.

विशेष म्हणजे याच आंदोलन स्थळी संपूर्ण जमिनीची पूर्णता एक मूस्त खरेदी करण्यात यावी, जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा, कंपनीने गाव रस्ता वाहतुकीसाठी न वापरता पर्यायी रस्ता बनवून घ्यावा, पेसा कायद्यानुसार एससी एसटी प्रकल्पग्रस्तांना विशेष सवलती देण्यात याव्या, रोजगार देण्यात यावे, ग्राम पंचायत दिशा निर्देशाचे कंपनीने काटेकोरपणे पालन करावे आदी मागण्यासाठी मागील २९ मार्च पासून प्रकल्पग्रस्ताचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. त्याना कंपनीचे काम पूर्ववत सुरू होत असल्याची कुणकुण लागताच प्रकल्पग्रस्ताच्या रास्त मागण्या मान्य झाल्याशिवाय काम सुरू न होण्यासाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. वाहतूक रोखून धरली. त्यामुळे कंपनीचे काम सुरळीत होण्यासाठी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी ठाणेदार संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. तहसीलदार व्हटकर, नायब तहसीलदार प्रवीण चीडे, तलाठी मडावी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी कंपनीचे काम सुरळीत सुरू केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये