ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिकेच्या सर्व्हेत १४ टक्के घरांमध्ये आढळली डासांची अंडी

कंटेनर सर्वे मोहीमेचा पहिला टप्पा पुर्ण - ६५ हजार घरांची तपासणी दुसऱ्या टप्प्यात दूषित आढळल्यास होणार दंड

चांदा ब्लास्ट

डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेमध्ये जवळपास १४ टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. पावसाळा सुरु असुन डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार पसरु नये या दृष्टीने मनपामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
मनपा आरोग्य विभागामार्फत २५ ब्रिडींग चेकर्स, ३५ एमपीडब्लूद्वारे डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यास कंटेनर सर्वे राबविला जात आहे. सर्वे अंतर्गत आतापर्यंत ६५ घरांची तपासणी करण्यात पुर्ण करण्यात आली असुन यात जवळपास १४ टक्के घरे दुषित आढळली आहेत. हे प्रमाण मोठे असल्याने सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.कंटेनर सर्वेचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये डासअळी उगमस्थाने आढळतील त्यांना दंडीत केले जाणार आहे.
डेंग्युचा डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करा. कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका. पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाका. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो.
डेंगू हा जीवघेणा आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे डांस वाढीला प्रतिबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे.डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये