Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने मतिमंद विद्यार्थ्यांसोबत 76 वा स्वतंत्र दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           76 व्या स्वतंत्र दिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय भद्रावती येथे स्वतंत्र दिनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आम आदमी पार्टी भद्रावती चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कार्यक्रमात आमंत्रीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज शाहा व प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल शेलार उपस्थित होते.

शहर अध्यक्ष सुरज भाऊ शाहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. त्याच प्रमाणे प्रफुल शेलार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर शहर अध्यक्ष सुरज शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात विद्यालयाचे संस्थापक पाचपोर साहेब यांनी आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त केले. या वेळी इतर शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते. आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त चॉकलेट व बिस्कीट वाटप करून मुलांचे तोंड गोड करण्यात आले. संचालनाचा कार्यक्रम हा रितेश नगराळे यांनी पार पाडला तर आभार प्रदर्शन चेतन पाचपोर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचिव सचिन पाटील, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, मंगेश भाऊ खंडाळे, अतुल भैसारे, केशवभाऊ पचारे, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, विनोद भाऊ लांडगे, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये