Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी माती माझा देश अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे 9 ऑगस्ट पासून माझी माती माझा देश अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानांतर्गत दि. 9 ऑगस्ट ला पंचप्राण शपथ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली तसेच ऑनलाइन शपथ सुद्धा विद्यार्थ्यांनी घेतली व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
याच अभियानाअंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तकग्राम चोरा, तहसील भद्रावती येथे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी चोरा गावच्या सरपंच सौ संगीताताई खेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ गजेंद्र बेदरे, डॉ एन एस वाढवे, प्राध्यापक कुलदीप भोंगळे तसेच स्व मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालयाचे प्राचार्य बरडे सर, श्री बांदुरकर सर, श्री घोडे सर, श्री वाकडे सर तसेच रा से यो चे स्वयंसेवक व गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये