Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

        राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात बसस्थानकांची विविध बाबींच्या आधारावर मुल्यांकन करून त्यांना पुरस्कार दिले जाणार आहे.

     पुरस्कारासाठी बसस्थानकांची निवड करण्याकरीता विभाग नियंत्रकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमन्यात आली आहे. ही समिती दर दोन महिन्यांनी नेमुन दिलेल्या विभागाची तपासणी करून अहवाल मध्यवर्ती समितीकडे सादर करतो. वार्षिक मुल्याच्या सरासरी नुसार एकून गुणांच्या किमान 75 टक्के गुण असलेल्या बसस्थानकांचाच पुरस्कारासाठी विचार केला जातो. समसमान गुण असल्यास ज्या बसस्थानकावरील बसफेऱ्यांची संख्या जास्त आहे, असा स्थानकास वरचा क्रमांक दिला जाणार आहे. बक्षिसाची रक्कम बसस्थानकाच्या विकासासाठी व वर्षभर स्वच्छतेबाबत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिस देण्यासाठी खर्च करता येणार आहे.

            बसस्थानक तपासणीचे मुल्यांकन बसस्थानक व प्रसाधनगृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापक, हरित बसस्थानक, बसस्थानकावर येणाऱ्या बसेसची सखोल स्वच्छता, विविध महोत्सवाचे आयोजन, प्रवासी वाढवा अभियान या आधारावर होणार आहे. त्यासाठी वेगवेगळे गुण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, जाम, हिंगणघाट, कारंजा, पुलगाव, सेलू, आष्टी, तळेगाव, देवळी ही बसस्थानके अभियानात सहभागी झाली असल्याचे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये