ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका रानभाज्या महोत्सवाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

       स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या विद्यार्थ्यांनी सावली कृषी विभागाच्या वतीने परिसरातील लोकांना व शेतकरी यांना रानभाज्यांची ओळख व्हावी, म्हणून दिनांक 14/08/2023 ला रानभाजी महोत्सव घेण्यात आले .या महोत्सवामध्ये सावली,व्याहाड,चकपिरंजी व खेडी या गावातील महिला बचत गटानी सहभाग नोंदविला होता.या रानभाजी महोत्सवाला स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने प्रा.देवीलाल वताखेरे सर,प्रा.डॉ.सचिन चौधरी सर,प्रा.स्मिता राऊत मॅडम आणि विद्यार्थ्यांनी भेट दिली.

या भेटीत विद्यार्थ्यांना कडूभाजी, कुड्यांचे फुल, चुचुर, पातूर,गोफण, तरोटा, रानधोपा,अंबाडी या सारख्या अनेक रांनभाज्यांचे महत्व व उपयोगिता बद्दल माहिती व फायदे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.या महोत्सवाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी घोडसे मॅडम,कृषी परिवेक्षक पानसे सर आणि काळे सर यांनी केले. या महोत्सवाला परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये