ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या ऑनलाईन टोळीवर तहसीलदार यांची कारवाई

व्ही एस ऑनलाइन सेंटरवर धडक कारवाई ; तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई - आढळून आले बोगस स्टॅम्प व उत्पन्नाचे दाखले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 17/8/2023 रोजी दुपारी 11 ते 12च्या दरम्यान फिर्यादी नामे नितीन सुळे राहणार वर्धा वय वर्ष 51 यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना उत्पन्न दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार देण्यात आलेली होती यावर जिल्हाधिकारी यांनी नेमून दिलेले वर्धा तहसीलचे उपविभागीय अधिकारी श्री दिपक करंडे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनामध्ये व्ही एस ऑनलाइन सेंटर वर जाऊन तपासणी केली.

यशवंत कॉलेज जवळील विविधा कार्यालयासमोरील जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार रमेश कोळपे यांना मिळालेल्या माहितीनुसार व्ही एस ऑनलाइन सेंटरवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये या ऑनलाइन सेंटरवर उत्पन्नाचे दाखले,कास्ट व्हॅलिडीटी तसेच स्टॅम्प सुद्धा आहे बोगस असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी या ऑनलाइन सेंटरवर तहसीलदार तसेच त्यांची टीम आणि नायब तहसीलदार बाळू ताई भागवत नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी बोगस स्टॅम्प तसेच उत्पन्नाचे दाखले आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे..यामध्ये आरोपी विकास शेळराव कुंभेकर रा. सेलुकाटे, यांची पत्नी शुंभागी विकास कुंभेकर वय 25 वर्षे रा.सेलुकाटे,यश वसंत शंभरकर गाडगेनगर म्हसाळा, विवेक विनोद हागे रा. सालोड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यावेळी पंचा समक्ष येथील चार चाकी गाडी तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त करण्यात आलेले आहे या कारवाईच्या वेळी नायब तहसीलदार बाळूताई भागवत, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथील पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, डी बी जमादार संजय पंचभाई,दिनेश तुमाणे,पोलिस कर्मचारी तहसील कार्यालयातील कर्मचारीही कारवाई मध्ये उपस्थित होते.

या ऑनलाईन सेंटर वरील कारवाईमुळे वर्धा शहरांमध्ये चांगले खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांनी आता उत्पन्नाचा दाखला असो किंवा कोणत्याही प्रमाणपत्र असो हे सुद्धा आता तपासून पहावे लागणार आहे भविष्यामध्ये लागणारे कागदपत्रे जर बोगस निघत असेल तर विद्यार्थ्यांनी न्याय मागावा तरी कोणाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये