ताज्या घडामोडी

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवारात ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा

अमृत महोत्सवी वर्षातील स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने त्यांनी महापुरुषांना अभिवादन

चांदा ब्लास्ट

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, गोरक्षण वॉर्ड, बल्लारपूरच्या आवारात १५ ऑगस्ट रोजी ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल, बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महिला सक्षमीकरण करिता अग्रेसर असलेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे आवार नव्याने बल्लारपूर येथे सुरू झाले आहे. प्रथमच या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला.

“२१ व्या शतकातील शिक्षणातील आव्हाने, संधी आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर यावेळी संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी भाष्य केले. सोबतच अमृत महोत्सवी वर्षातील स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने त्यांनी महापुरुषांना अभिवादन करीत त्यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. सोबतच नव्याने सुरू झालेल्या विद्यापीठाच्या आवाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक वेदानंद अलमस्त, प्रा. नेहा गिरडकर तथा शिक्षकेतर कर्मचारी आशिष नुगुरवार, वैशाली बोमकंटीवार, ममता भेंडे, मनोज अर्गेलवार सह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये