ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड

3 आरोपींना अटक, 48 हजाराचा ऐवज जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर सुरु असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी 12 ऑगस्ट ला सायंकाळी छापा टाकला.3 आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम सह 47 हजार 950 रुपयांचा ऐवज जप्त केला आहेत.

शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर एका पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन चक्री नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने धाड टाकली.

यावेळी पोलिसांनी आरोपी अतिस रामा खरात,भरत वसंत कांबळे, प्रकाश सदाशिव कांबळे, सर्व रा त्र्यंबक नगर देऊळगाव राजा यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या ताब्यात असलेले 32 इंची एल इ डी ,किंमत 15 हजार रुपये, रिमोट,3 हजार रुपये, इतर संगणक साहित्य,15 हजार रुपये तसेच इतर साहित्य, रोख रक्कम 2 हजार 750रुपये,10 हजार रुपयांचा मोबाईल, आणि इतर साहित्य असा 47 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला आहे, आरोपी विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये