ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस. टी. महामंडळचा अधिकारी यांचा अत्याचारला कंटाळून राहुल जैस्वाल यांची आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-येथील विद्या नगर वॉर्ड रहिवाशी मृतक राहुल विजय जैस्वाल (44)याने 2मे चा रात्री आपल्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्या पूर्वी मृतकाने सुसाईड नोट लिहून ठेवले त्यात त्यानेएस टी महामंडळ चे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा आर्थिक आणि मानसिक जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचे कारण लिहून ठेवले.

मृतक राहुल जैस्वाल मागील काही दिवसा पासून अस्वस्थ होता त्याला त्याचा जवळ चे नातेवाईक, अधिकारी व कर्मचारी त्याला आर्थिक व मानसिक त्रास देत होते त्यांना फोन पे, नगद असे हजारो रुपये दिले. सर्वात जास्त दुःख त्याचे वरिष्ठ अधिकारी DTO साहेब यांनी दिल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहलेले आहे. सुसाईड नोट मध्ये असेही लिहले आहे की यातील काही व्यक्ती घरी बोलावून वशिकरण करून पैसे घेतात यांचा बंदोबस्त करने आवश्यक आहे. सुसाईड नोट मध्ये त्याला आर्थिक व मानसिक त्रास देणाऱ्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे अशी इच्छा मारण्या पूर्वी व्यक्त केली. राहुल हा एस टी महामंडळ मध्ये नौकरी वर होता त्याला एक मुलगा एक मुलगी आहे. त्याने सुसाईड नोट मध्ये त्रास देणाऱ्या चे नावा सहित मोबाईल नंबर दिले आणि त्यांना किती रुपये दिले याचाही उल्लेख केला आहे.

एस टी महामंडळ चे DTO यांनी म्हटले की तू राजीनामा दे तुझी काही आवश्यता नाही तुझी असे म्हटल्या नंतर DTO साहेब चा आदेशानुसार घरी नाही, देवा घरी जात आहे, हे अधिकारी कधीही कर्मचारी चे होत नाही. यांना सक्त कारवाई झाली पाहिजे अशी आत्महत्या पूर्वी इच्छा व्यक्त केली.

एस टी महामंडळात कार्यरत कर्मचारी विजय जयस्वाल (44) ह्याने अधिकाऱ्यांच्या जाचाला व आर्थिक पिळवणुकिला कंटाळुन अखेरीस गळफास लाऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असुन होणाऱ्या त्रासाबद्दल त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत अनेक खळबळजनक खुलासे केले असल्याची तसेच त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव व मोबाईल क्रमांक लिहिले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की बल्लारपूर शहरातील विद्या नगर वॉर्ड येथे वास्तव्यास असलेल्या राहुल विजय जयस्वाल (44) ह्याने 2 मे च्या रात्री आपल्या राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक राहुल जैस्वाल मागील काही दिवसा पासून अस्वस्थ होता, त्याला त्याचा जवळचे काही नातेवाईक, अधिकारी व कर्मचारी आर्थिक व मानसिक त्रास देत होते. राहुलने त्यांना फोन पे व नगदी स्वरूपात हजारो रुपये दिले असल्याचे लिहून ठेवले असुन आपल्याला सर्वात जास्त त्रास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे देखिल नमुद असल्याचे कळले. त्याचप्रमाणे यातील काही व्यक्ती घरी त्याला बोलावून वशिकरण करून पैसे घेत असल्याचेही त्याने लिहून ठेवले आहे. सुसाईड नोट मध्ये त्याला आर्थिक व मानसिक त्रास देणाऱ्यावर सक्त कारवाई व्हावीअशी अंतिम इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

राहुल हा एस टी महामंडळ मध्ये नोकरी वर होता त्याला एक मुलगा एक मुलगी आहे. त्याने सुसाईड नोट मध्ये त्रास देणाऱ्याचे नावासहित मोबाईल नंबर दिले आणि त्यांना किती रुपये दिले याचाही उल्लेख केला आहे. एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ‘राजीनामा दे तुझी काही आवश्यता नाही’ असेही बोलल्याचा उल्लेख असुन त्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आता मी घरी नाही तर देवा घरी जात आहे, हे अधिकारी कधीही कर्मचारी चे होत नाही. यांना सक्त कारवाई झाली पाहिजे असे लिहून गळफास घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये