ताज्या घडामोडी

राजुरा येथे अखंड भारत दिन उत्साहात साजरा – अखंड भारताच्या निर्मितीसाठी झटण्याची युवकांनी घेतली शपथ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

🚩 *अखंड भारत दिन साजरा*🚩
राजुरा तेथे आज विश्व हिंदु परीषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्फे श्री संकटमोचन हनुमान मंदिर, न.प.जवळ राजुरा येथे अखंड भारत दिन साजरा करण्यात आला.
प्रथम भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून सर्व कार्यकर्त्यांनी भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय जनमानसाचे आराध्य प्रभु श्रीराम व महावीर हनुमानाचे  पूजन केले.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह कैलाश कार्लेकर, विश्व हिंदु परीषदेचे रूपेश भाकरे यांनी अखंड भारत दिनाचे महत्त्व विषद केले. सदर कार्यक्रमात सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अखंड भारत निर्माण करण्यासाठी प्रभु श्रीरामाच्या साक्षीने प्रतिज्ञा घेतली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारंग रामगीरवर , अंकुश घाटोळे, राकेश अल्लुरवार, विश्व हिंदु परीषदेचे प्रखंड सहसंयोजक व्यंकटेश कदम, नगर संयोजक प्रफुल घोटेकर, चेतन निमकर, यश बंडी, ह्यंचेसह इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये