ताज्या घडामोडी

बिबटच संशयास्पद मृत्यू

भगवानपुर कक्ष क्रमांक 909 PF मधील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी पासून जवळ असलेल्या उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी नियतक्षेत्र भगवानपूर मधिल कक्ष क्रमांक 909 PF मध्ये गस्ती दरम्यान बिट वनरक्षक श्री. एम. वाय. बोरचाटे यांना पर्यावरण प्रयत्न आणि फलोत्पादन प्रकल्प च्या जवळील झुडपात बिबट मृत अवस्थेत आढळून आला असता त्यांनी भ्रमणध्वनीव्दारे वरिष्ठांना कळविले. त्यानुसार श्री. एस.बी. नरड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) उत्तर ब्रम्हपुरी हे अधिनिस्त वनकर्मचारी यांना घेऊन मोकास्थळी पोहचले. घटनेची पाहणी केली असता, घटनास्थळावर बिबट (नर) वय अंदाजे 2 ते 3 वर्ष मृत अवस्थेत पडून असल्याचे आढळले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनी व्दारे कळविण्यांत आली. त्यानंतर घटनास्थळावर मा. श्री. एम.बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग ब्रम्हपुरी, श्री. आर.डी. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) दक्षिण ब्रम्हपुरी, श्री. विवेक कळंबेकर, मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी, डॉ. एस. व्ही. सास्तुरकर सहायक आयुक्त पंचायत समिती ब्रम्हपुरी, डॉ. के. वाय. पराते, पशुवैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी, श्री. ललीत उरकुडे अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशन चे सचिव, श्री. एम.एच. सेमस्कर क्षेत्र सहायक ब्रम्हपुरी व इतर वनकर्मचारी हे हजर झाले. त्यांनी मृत बिबटचे निरिक्षण केले. सदर बिबटयाचे सर्व अवयव शाबुत असल्याची खात्री केली.

मौकास्थळाची चौकशी करुन हे प्रकरण शिकारीचे नाही याची खात्री वरिल सर्व उपस्थित अधिकारी यांनी केल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्याच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशान्वये डॉ. एस. व्ही. सास्तुरकर, श्री. के. वाय. पराते पशुवैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी यांनी सदर मृत बिबटयाचे शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी करीता नर बिबटचे नमुने (विसेरा) घेण्यात आले. सदर बिबटचे शवविच्छेदन दरम्यान पशुवैद्यकिय अधिकारी यांना लंग्स प्युट्रीफिकेशन झाल्याचे दिसून आले. बिबटचे (नर) शवविच्छेदन झाले नंतर मा. वन अधिकारी व उपस्थित सर्व अधिकारी व पंचाच्या उपस्थितीत सदर बिबटचे सदर बिबटचे (नर) मौका स्थळावर दहन करुन त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.

सदर नमुने उत्तरीय तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविण्यांत येणार असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर व पशुवैद्यकिय अधिकारी, यांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेनंतर मृत्यूचे खरे कारण कळेल असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये