Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय मजदुर काँग्रेसच्या इंटक चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर विजय धोबे यांची नियुक्ती

इंटकचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मजदुर काँग्रेसच्या इंटक चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर विजय धोबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय मजदुर काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष त्रीशरण सहारे यांनी विजय धोबे यांना राष्ट्रीय मजदुर काँग्रेसच्या इंटक चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीचे पत्र दिले आहे. धोबे यांच्या नियुक्तीचा संघटनेच्या वाढीसाठी फायदा होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. विजय धोबे यांच्या इंटकचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील स्वागत केले आहे.

धोबे यांचे नियुक्तीबद्दल कांग्रेस नेते रामू तिवारी, मोहन डोंगरे पाटील, प्रविण पडवेकर, नंदु नागरकर, मतीन कुरेशी, इजाज कुरेशी, रवि भिसे, पप्पू सिद्दीकी, अभय धोबे, दशरथ देहारकर, सचिन रामटेके, प्रविण डाहुले, बबलू मुनशेट्टीवार, स्वप्नील चिवंडे यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये