Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.डी.एल.आय.व एन लिस्ट -ई रिसोर्स वर कार्यशाळेचे आयोजन

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व आयकूएसई विभागाचे वतीने भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खोब्रागडे यांनी एन.डी.एल. आय.व एन लिस्ट हे केंद्र शासनाचे मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारे चालविण्यात येणारे डिजीटल लायब्ररी असून या डेटाबेसेसच्या माध्यमाने जागतिक स्तरावरील शासनाद्वारे सुरू करण्यात आलेले आँनलाईन ग्रंथालय सेवा असून आपण कुठेही बसून नेटवर्कच्या माध्यमाने ग्रंथ व इतर वाचन साहित्य प्राप्त करू शकतो व आपली शैक्षणिक गरज भागवू शकतो. हे एक असे केंद्र आहे की यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत आवश्यक असलेले ग्रंथ आडीओ व्हिडिओ हस्तलिखिते पीएचडी चे थेसीस तसेच इतरही शैक्षणिक साहित्य याद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तरी विद्यार्थी व कर्मचारी यांचा लाभ घ्यावा व आपले जीवन यशस्वी करावे असे उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन म्हणून प्रा.संदीप देशमुख यांनी एन लिस्ट, एनडीएलआय यांचे अकांउट कसे तयार करायचे, त्यामधून आवश्यक असलेले साहित्य कसे शोधायचे व प्राप्त करायचे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रास्ताविकेतून प्रा.दिलीप सोनटक्के यांनी एन लिस्ट, एनडीएलआय यावर सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र गड्डमवार व सचिव सुरज बोम्मावार व महाविद्यालयीन शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये