बल्लारपुरातील सुधीर लोखंडे आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांना सानुग्रह मदत..
सोबत, एकाला नोकरी द्या - राजू झोडे यांच्यासह पीडित कुटुंबियांची मागणी

चांदा ब्लास्ट
बल्लारपुरातील सुधीर लोखंडे आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांना सानुग्रह मदत व एकाला नोकरी द्या अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्यासह पीडित कुटुंबियांनी केली असून तसे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले आहे.१० दिवसाच्या आत मदत व नोकरी न मिळाल्यास पेपर मिलच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
मृतक सुधीर लोखंडे हे मागील २५ वर्षापासून पेपर मिलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते.परंतु तेथील ठेकेदार संजय दानव व एचआर अजय दुरुडकर यांनी लोखंडे यांचा मानसिक छळ करून त्यांना आत्महत्यसाठी प्रवृत्त केले.त्यांनतर त्यांनी ९ ऑगस्टला गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यानंतर संपूर्ण लोखंडे कुटुंबीय मानसिक धक्क्यात असून घरातील कर्ता गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मृतक सुधीर लोखंडे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळं पेपर मिल प्रशासनाने लवकरात लवकर लोखंडे कुटुंबियांना सानुग्रह मदत करून घरातील एकाला नोकरीमध्ये सामावून घ्यावे, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर 306 सोबत एट्रासिटी एक्ट गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा पेपर मिल समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मृतक सुधीर लोखंडे यांच्या पत्नी सविता लोखंडे व उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, सविता सुधीर लोखंडे, सुप्रिया सुधीर कोरबे,भास्कर भगत,करुणा भगतत्, ताराचंद थुल,अमर पळोडे,प्रा भारत लोखंडे,आदि यांनी केली आहे.



