ताज्या घडामोडी

खुनाच्या गुन्ह्यात फरार असणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचेकडुन शिताफीने अटक

चांदा ब्लास्ट :

जिल्हा प्रतिनिधी अविनाश नागदिवे

दिनांक :- 13 ऑगस्ट 2023

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 06/08/2023 रोजी रात्रीचे 21.00 वा. चे दरम्यान आरोपी सचिन किसन कांबळे, रा- इतवारा बाजार, वर्धा याने फिर्यादी मेहबुब रुस्तम शाह वय 56 वर्षे, रा. इतवारा, वर्धा याचे घरात अनधिकृत प्रवेश करुन त्याचे पत्नी मरीयम रुस्तम शाह, वय 60 वर्षे हीला मेरे को मारने के लिये तुमने सुरज गौतम और धिरज गौतम इनको क्युं भडकाया, रुक तुमारी गर्दन उतारता हूँ असे म्हणुन फिर्यादी महबुब रुस्तम शाह यास घरातुन बाहेर ओढत आणुन त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे डोक्यावरुन तलवार फिरवली त्यामुळे फिर्यादी घाबरून पळत असताना फिर्यादीची पत्नी नामे मरीयम रुस्तम शाह, वय 60 वर्षे ही त्याला वाचविण्याकरीता त्याचे मधे येवुन तु मेरे पती को क्युं मारता है असे म्हणाली तेंव्हा यातील आरोपी सचिन कांबळे याने तिचे केस पकडुन तिला इतवारा बाजार रोडवर खाली पाडुन त्याचे हातातील असणा-या तलवारीने मानेवर सपासप वार करुन तिला जिवानिशी ठार केले. अशा फिर्यादी यांनी दीलेल्या तोंडी रिपोर्टवरुन पो स्टे वर्धा शहर येथे

कलम 302, 307,452,504, 506 भा.द.वि सहकलम 4, 25 भा. ह. का प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
सदर गुन्हयातील रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सचिन कांबळे हा घटना तारखेपासुन फरार होता. त्याचे शोधसंबंधाने वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे सुरु होते परंतु आरोपी हा सातत्याने स्वतःचे आस्तीत्व लपवत होता. मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याचा मुरैना, इटारसी, ग्वालीयर, झाशी, भोपाळ (मध्य प्रदेश) तसेच महाराष्ट्रातील नागपुर, चंद्रपुर, बुटीबोरी, बर्धा परीसरात त्याचा शोध सुरु होता, नमुद आरोपी हा अट्टल गुन्हेगार असल्याने वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलुन पोलीसांना गुंगारा देत होता… आज दिनांक 13/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तो बसने चंद्रपुर वरुन वर्धेला आला असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्याचा पुलफेल, तारफेल, आनंदनगर, बोरगाव, मसाळा परीसरात शोध घेत असताना त्यास बोरगाव परीसरातील श्रीरामनगर येथे अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले असुन नमुद आरोपी यास विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे, यांचे मार्गदर्शनामध्ये पोनि कैलास पुंडकर, पोनि संजय गायकवाड, सपोनि संतोष दरेकर, पोउपनि अमोल लगड, पोउपनि राम खोत, पोलीस अंमलदार सुभाष राउत, संतोष दरगुडे, सचिन इंगोले, हमिद शेख, चंद्रकांत बुरंगे, प्रमोद पिसे, अवि बनसोड, यशवंत गोल्हर, राजेश तिवसकर, श्रीकांत खडसे, संजय राठोड, मनिष कांबळे, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, पवन पन्नासे, विकास अवचट, राकेश अष्टनकर अनुप कावळे, अमोल ढोबाळे, संघसेन कावळे स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये