यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
(CPTP 12) चे परिविक्षाधीन अधिकारी यांच्या महाराष्ट्र दर्शन दौऱ्यामध्ये त्यांनी आज उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा येथे भेट दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे होत्या तर कार्यक्रमाला 32 परिविक्षाधीन अधिकारी (पोलिस उप अधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त, सहायक कामगार आयुक्त, उप मुख्य कार्यकारी अधिकारी/गट विकास अधिकारी,मुख्याधिकारी, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा या विविध संवर्गातील वर्ग अ अधिकारी), यशदाचे प्राध्यापक श्री. अमोल बामिष्टे व योगेश कांबळे तसेच परिवहन कार्यालयातील परिविक्षाधीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सौरव सातव, मोटर वाहन निरीक्षक नितीन उके , प्रफुल मेश्राम व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सहा.मोटर वाहन निरीक्षक अक्षय माळवे यांनी केले.
सर्वप्रथम कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा कक्षा मध्ये अधिकाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर सर्व परि. अधिकाऱ्यांना कार्यालयातील सर्व विभागांची ओळख करून देण्यात आली तसेच दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी परिवहन विभागाबद्दल, रस्ता सुरक्षा विषयी तसेच शासकीय कामकाजामध्ये असलेल्या आंतर विभागीय समन्वयाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अधिकाऱ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला.
परि. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सौरव सातव यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमांची सांगता केली.


