ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीत संविधान बचाव पदयात्रा व संविधान सत्यशोधक जलसा कार्यक्रमाचे आयोजन

विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते,आ. विजय वडेट्टीवार व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, सुप्रसिद्ध गायक अनिरूद्ध वनकर यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे, स्वातंत्र्याचे आणि समानतेचे संरक्षण करणारे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. संविधानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे, संविधानिक मूल्यांबाबत जनजागृती करणे आणि महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी ब्रह्मपुरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

काॅंग्रेस कमीटीच्या वतीने सकाळी १० वाजता ब्रम्हपुरी येथील तालुका काँग्रेसच्या नवीन कार्यालयापासून ख्रिस्तानंद चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत(गुजरी वार्ड) ‘संविधान बचाव पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता तालुका काँग्रेसच्या नवीन कार्यालयात ‘संविधान सत्यशोधक जलसा’ आयोजित करण्यात आला आहे.

या जलशामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक अनिरूद्ध वनकर व अन्य कलावंत संविधान, सामाजिक समता आणि महापुरुषांच्या विचारांवर आधारित प्रबोधनात्मक सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाला विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संविधानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी, महापुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ब्रह्मपुरी शहरासह तालुक्यातील नागरिक, युवक, महिला व संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काॅंग्रेस कमीटीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये