ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूरच्या विकासाला २१ कोटींचे बळ!

आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर : गडचांदूर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे २१ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमामुळे गडचांदूर शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या विकासकामांमध्ये राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या पाण्याच्या वाहिनीचे काम, मुक्तिधाम परिसरातील घाट, पायऱ्या, रस्ते व अन्य बांधकामे, स्व. अटल बिहारी वाजपेयी सांस्कृतिक सभागृह, आठवडी बाजारातील मटन मार्केट, नवनिर्मित नमो उद्यान, वाचनालय, उद्यान परिसर, माता मंदिर ते महात्मा ज्योतिबा फुले चौकापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण, सिमेंट काँक्रिट रस्ते, नाली व पेव्हर ब्लॉक अशा विविध विकासकामांचा समावेश आहे.

या विकासकामांमुळे शहरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, सांस्कृतिक सुविधा आणि बाजारपेठेचा विकास होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. नियोजनबद्ध विकासकामांमुळे गडचांदूर शहराच्या सौदर्यात पडण्यासोबतच भविष्यातील विकासाचा मार्गही अधिक मजबूत होणार आहे.

विकासकामांमुळे नागरिकांना दिलासा

शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मूलभूत सुविधांचा विकास, रस्त्यांची मजबुती आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीमुळे गडचांदूरच्या विकासाला गती मिळणार आहे. मंजूर विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

भाजप पदाधिकारी, व्यापारी व नागरिकांची मोठी उपस्थिती

या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोथे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेचवार, राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष स्मिता चिताडे, नगरसेवक सतीश बेतावार, सुरेश मेश्राम, सपना सेलोकर, शितल धोटे, कीर्ती वैरागडे, संगीता गावत्रे, अरविंद कोरे, शिवाजी सेलोकर, हरी धोरे, हंसराज चौधरी, ग्रामीण महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, गणेश आडे, रौफ शेख, नितेश भिवापुरे, मकसूद अली, सचिन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मनोज बेतावार, नागेश रोहणे, नौमन रोख, प्रीतम सातपुते, हितेश चव्हाण, देविदास पेंदोर, धनंजय छाजेड, सत्यदेव शर्मा, तुषार देवकर, राहुल चुरे, सचिन आस्वले, मेहताब शेख, विक्की उरकुडे, रवी बंदीवार, निखिल भोंगळे, अजय सारवे, वैभव पोटे, जयंत भोंगळे, शाकीर रोख, रश्मी भालेराव यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व्यापारी असोसिएशन तथा समस्त व्यापारी मंडळ, गडचांदूर यांच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्ष हंसराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमातून शहराच्या विकासासाठी सकारात्मक संदेश देण्यात आला.

गडचांदूरच्या विकासाचा संकल्प, नागरिकांच्या अपेक्षांना नवी दिशा आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीला मिळालेली गती यामुळे शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. यावेळी गडचंद्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये