Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

चंद्रपूरचा तैतील बट्टे प्रथम तर नागपूरची प्रगती खोब्रागडे द्वितीय

चांदा ब्लास्ट

विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल विचारज्योत फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनी म्हणजे १२ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये चंद्रपूरच्या तैतील कालिदास बट्टे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर नागपूरच्या कु. प्रगती खुशाल खोब्रागडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि तृतीय क्रमांक गणेश सोमाजी श्रीरामे यांनी पटकाविला.
राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा ही भारतीय संविधान, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्लिश, बुद्धिमत्ता, इतिहास या विषयावर रविवार, दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी गूगल फार्मद्वारे घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रोत्साहनपर क्रमांक रविंद्र बापन्ना भंडारवार, शेख इरफान इकबाल, विवेक मुलावकर, भास्कर गंगाधर ताजने, संतोष मोतीराम बट्टे यांनी प्राप्त केला.
विचारज्योत फाऊंडेशनकडून प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्यांना ५०००/- रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना ३०००/- रुपये, तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना २०००/- रुपये तसेच प्रोत्साहन प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना १०००/- रुपये आणि प्रोत्साहन तृतीय, चतुर्थ आणि पाचवा क्रमांक प्राप्त विजेत्यांना रुपये ५००/- बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विचारज्योत फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरज पी दहागावकर, कोषाध्यक्ष दिनेश मंडपे, सचिव मुन्ना तावाडे, उपाध्यक्ष सिद्धार्थ दहागावकर, सदस्य तृप्ती साव, लक्ष्मीकांत दुर्गे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, पंकज सावरबांधे, उमेश कोर्राम, अस्मिता खोब्रागडे, विशाल शेंडे, प्रतीक्षा वासनिक आणि प्रलय म्हशाखेत्री यांनी सहकार्य केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये