ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन…

सहभागी सर्व स्पर्धकांना देण्यात येईल सहभाग प्रमाणपत्र

चांदा ब्लास्ट
विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर या सामाजिक संस्थेला येत्या १२ ऑगस्ट २०२३ ला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ऑनलाइन सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विचारज्योत फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे. सामान्यज्ञान स्पर्धा हि बहुपर्यायी स्वरूपाची असून या स्पर्धेमध्ये १५-४० वयोगटातील स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ आहे.
सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय अनुक्रमे ५०००/- रुपये रोख, ३०००/- रुपये रोख, २०००/- रुपये रोख असे रोख बक्षिसे देण्यात येणार असून सोबतच एकूण पाच प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये अनुक्रमे १०००/- रुपये रोख चे दोन बक्षिसे आणि ५००/- रुपये रोख चे तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी दहागावकर (८६९८६१५८४८, ९९६००२०७६२) आणि दिनेश मंडपे (८९९९५५८७४५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये