Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तत्पर सेवा – महावितरणने अवघ्या २४ तासात दिली नविन वीज जोडणी

मोहिमेअंतर्गत जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी

चांदा ब्लास्ट

 सौदारी यांनी महावितरण कडे नविन वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या २४ तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी देण्यात आली.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुक सेवा देण्याची सुचना केली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी व अभियंता यांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तत्परतेने देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर परिमंडल अंतर्गत ग्राहकांना वीज जोडण्या तसेच ग्राहकांच्या विविध तक्रारींचे वेळेत निरासन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु करुन कनकतारा सोदारी यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून चंद्रपूर उपविभाग क्र. १ येथे सद्दस्थितीत पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या संपुर्ण ग्राहकांच्या वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत व ही मोहीम चंद्रपूर परिमंडलांतर्गत सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडल यांनी चंद्रपूर उपविभाग क्र. १ चे उपकार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ व संपूर्ण चमुचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी श्री सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, श्रीमती संध्या चिवडे, अधिक्षक अभियंता, चंद्रपूर प्रविभाग, चंद्रशेखर दारव्हेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग, किर्ती चांभारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, वसंत हेडाऊ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चंद्रपूर उपविभाग क्र. १ साहील टाके, सहाय्यक अभियंता बाबूपेठ शाखा कार्यालय व सर्व जनमित्र उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी, महावितरण, चंद्रपूर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये