ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात “मेरी माटी मेरा देश”अंतर्गत शपथ ग्रहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       शरदराव पवार महाविद्यालयांमध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त राष्ट्रीय योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अन्वये रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी पंचप्रण शपथ विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिली. पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम दहा वाजता आयोजित करण्यात आला.
याआधी विरों का वंदन आणि माटी को नमन या उपक्रमांतर्गत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, मराठी विभाग प्रमुख डॉ. हेमचंद दूध गवळी ,गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.संजय गोरे,डॉ. सुनील बिडवाईक, डॉ. राजेश गायधनी डॉ.सत्येंद्रसिंह डॉ.मया मसराम, प्रा. मंगेश करंबे,कुमारी उज्वला जानवे इत्यादींची उपस्थिती होती.

विषय तज्ञ मार्गदर्शक डॉ. संजय गोरे यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व विशद करून स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून नव्या पिढीने वीरांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले यावेळी डॉ. हेमचंद दूध गवळी यांनी भारतिय इतिहास आणि परंपरेवर प्रकाश टाकला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिन निमित्त कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाचे संचालन रांसेयो कार्यक्रमअधिकारी आणि आभार डॉ.शरद बेलोरकर यांनी केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये