ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी, आमदार साहेब, तथा शिवप्रेमी यांच्यात शिल्प निधीसाठी चर्चा बैठक संपन्न

पंधरा दिवसात निधी देऊन शिल्पकार्य सुरू करा - आमदार वसंतराव आंबटकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

धुनीवाले मठ परिसरात असलेल्या जिजाऊ स्मारक येथे मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प लावण्यात यावे, अशी मागणी सातत्याने गेले अनेक दिवसापासून होत आहे. परंतु या मागणीकडे लोक प्रतिनिधी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण देशाचे आराध्य असून एक तर धुनीवाले चौकात स्मारक उभा राहिला नव्हते पाहिजे आणि उभारलेच तर त्यामध्ये शिल्प बसवायला पाहिजे होते अशी मागणी जनसामान्यात सातत्याने भेडसावत होती. त्यासाठी शिवसेनेचे वर्धा जिल्ह्याचे नेते तुषार देवढे, मराठा महासंघाचे उमाकांत डुकरे, अरुण जगताप, राजेंद्र वाकडे हे शिवभक्त आमरण उपोषणासाठी बसले. त्यापूर्वी निवेदन व एक दिवसीय निदर्शने करण्यात आली पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देऊन आम्रदूषक उपोषण करण्यात आले. प्रसिद्धी माध्यमांनी सदर गंभीर प्रश्नांची कैफियत वृत्तपत्रातून जाहीर केली. व ही बाब शासन दरबारी माहिती झाली.

उपोषण मंडपाला विद्यमान खासदार रामदाजी तडस यांनी भेट देऊन सौंदर्य करण्यासाठी दहा लक्ष रुपये देतो असे लेखी पत्र दिले. पण उपोषणकर्त्यांनी सौंदर्यकरण हा भाग वेगळा आहे. पण त्यामध्ये शिल्प नाहीत आपण शिल्पासाठी निधी द्यावा तर नंतर आपण उपोषण सोडणार यासाठी ठाम राहिले. दुसऱ्या दिवशी श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेबांची चर्चा करून उपोषण थांबविण्यासाठी मी शिवभक्तांना विनंती करतो व त्यांच्याशी येत्या दहा दिवसात चर्चा करून प्रश्न मार्गी लावतो असे श्रीमंत मोधोजी राजेंची चर्चा करून उपोषण मंडपात आले. यावेळी श्रीमंत मोदी राजांनी जिल्हाधिकारी साहेब. रामदासजी आंबेडकर साहेब यांच्याशी माझी काय चर्चा झाली हे उपोषण मंडपात कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी उपोषण सोडताना शिवसेनेचे तुषार देवळे म्हणाले की, शिल्प घेतल्याशिवाय अमर उपोषण मागे घेणार नाही पण श्रीमंत मोजोजीराजे हे आपले राजे आहेत. त्यांच्या शब्दाचा मान म्हणून आम्ही उपोषण सोडतो पण आम्हास एक महिन्याच्या आत शिल्पासाठी उपलब्ध नाही केला तर पुन्हा आमरण उपोषण टाकणार, व त्यावेळी उपोषणासाठी श्रीमंत मुधोजी राजे यांनी मी पण उपोषणात बसणार असे वचन दिले.

एक महिन्याच्या कालावधीनंतर रामदासजी आंबेडकर साहेब व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब तसेच शिवभक्त यांच्यामध्ये 9.7.2023 बुधवार रोजी सकाळी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी मी माझ्या शब्दावर ठाम आहे व आपणास शिल्प लावून देतो असे म्हटले. त्यानंतर आमदार रामदासजी आंबटकर साहेब यांनी सर्व समक्ष पंधरा दिवसाचे आत निधी उपलब्ध करून शिल्पकार्य सुरू करण्याचे स्वीय सहाय्यकांना निर्देश दिले. तुषार देवडे यांनी उपस्थितांसमोर विषयाची मांडणी करताना स्मारक शिल्प बसविण्याकरिता लोकप्रतिनिधी यांना सातत्याने विनंती करूनही त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने आम्ही आमरणउपोषणास बसलो. पण मासाहेब जिजाऊंचे स्मारक हे प्रेरणादायी आहे. कुठेतरी ऐतिहासिक वस्तूंचे जतन होऊन थोर पुरुषांच्या प्रतिभावनेचा आदर करून शिल्प लावून देण्याचे विषयाला आपण मदत करून उपस्कृत केल्याबद्दल वसंतरावजी आंबेडकर जिल्हाधिकारी साहेब यांना धन्यवाद दिले. स्मारक शिल्प बैठकीच्या चर्चेला शिवसेनेचे तुषार देवडे मराठा महासंघाचे उमाकांत डुकरे अरुण जगताप मुन्ना शिंदे राजेंद्र वाकडे शैलजा साळुंखे आधी कार्यकर्ते चर्चा दरम्यान उपस्थित होते.

शिल्प बसविण्यात आल्यानंतर स्मारकाच्या सौंदर्यकरणाकरिता दहा लक्ष रुपये खासदार रामदाजी तडस साहेब आपल्या निधीतून देऊन वैयक्तिक 50 हजार रुपये स्मारकाला देणगी देण्याचे वचन दिले. श्रीमंत मुधोजी राजे भोसले स्मारकाप्रती आपली वैयक्तिक देणगी व भेट देऊन आपल्या आंदोलनाचे काय झाले यासंबंधी मला कळवावे असे त्यांनी भ्रमणध्वनीवरून कार्यकर्त्यांची चर्चा केली. स्मारक शिल्प सौंदर्य करण्यासाठी सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी तसेच शिवभक्त नागरिक शासन दरबारचे अधिकारी तसेच पत्रकार बंधू यांना शिल्प आंदोलनाला मदत करण्यासाठी धन्यवाद व्यक्त केले. अनेक संघटना तसेच समाजसेवकांनी आंदोलनाच्या कालावधीमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून अमृत उपोषणास उपस्थिती दर्शविली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये