Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा तहसील कार्यालय तर्फे महसूल सप्ताह सांगता दिवस साजरा

वर्धा तहसीलचे पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री प्रज्वल पाथरे यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महसूल सप्ताहानिमित्त पुरवठा विभागात साफसफाई करण्यात आली

महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग महसूल विभागाचे कार्य, कार्यपद्धती आणि सेवा याबाबत अधिकाधिक याची नागरिकांना माहिती व्हावी आणि त्यांचे सहकार्य वाढावे याच उद्देशाने 1 ते 7 ऑगस्ट २०२३ रोजी दरम्यान महसूल सप्ताह राज्यभर साजरा करण्यात येतो आहे.

 

यामध्ये प्रामुख्याने ‘ एक हात मदतीचा ‘ हा उपक्रम राबविण्यात आला.सप्ताहातील तसेच गेल्या महसूल वर्षातील उत्कृष्ठ तसेच नाविन्यपुर्ण काम करणारे उपविभागीय अधिकारी श्री दिपक करंडे आणि तहसीलदार श्री रमेश कोळपे व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती कल्पना गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री प्रज्वल पाथरे आणि पुरवठा निरीक्षक श्री महेश थेरे यांच्या उपस्थितीत संगणक ऑपरेटर मोहनिश राऊत सुमेध थुल शुभम रामटेके मधुकर खडसे मनोज राऊत कृष्णाजी म्हैसकर संजय नाखले यांनी शिक्षापत्रिका विभागात स्वछता अभियान राबविण्यात आला असून यानंतर २० वृक्षारोपण करण्यात आले आहे आणि गरजूंना ५० लोकांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले

यावेळी मेरी माटी मेरा देश म्हणून स्वस्त धान्य दुकानदार लोकांना मातीचे दिवे वाटप करण्यात आले पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री प्रज्वल पाथरे आणि पुरवठा निरीक्षक श्री महेश थेरे यांनी कार्यक्रमाचे श्रेय वर्धा येथील जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले आणि अप्पर जिल्हाधिकारी श्री नरेंद्र फुलझेले व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे वर्धा यांना देण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये