देवळी पोलीस ठाण्यात शोककळा; पोलीस कर्मचारी कुणाल कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा यांच्या उपस्थितीत होणार कुणाल कांबळे यांच्या अंतिम संस्कार कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यातील देवळी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कुणाल अरुणराव कांबळे (वय ३५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सांवगी मेघे रुग्णालय वर्धा दुःखद निधन झाले. ही घटना मंगळवारी रात्री सावंगी मेघे येथील रुग्णालयात घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.
कुणाल कांबळे हे देवळी पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. ते २०१४ च्या पोलीस भरती बॅचचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांची जीवनयात्रा संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्तव्य बजावणाऱ्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या अकाली निधनाने पोलीस विभागाने एक सहकारी गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सहकारी पोलीस कर्मचारी, मित्रपरिवार आणि परिचितांमधून दुःख व्यक्त केले जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
दिवंगत कुणाल कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना. यांच्या अंतिम संस्कार कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा तसेच अपर पोलीस सदाशिव वाघमारे वर्धा देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदिप कापडे पोलीस व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत….आणी त्यांचा अंतिम संस्कार त्यांच्या राहत्या गावी सालोड हिरापूर येथे होणार आहे…



