राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री प्रभु रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे 11 ऑक्टोबर 2026 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल मुसळे सरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा उलघडा करत मोलाचे मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी प्रा. विरुटकर मॅडम व प्रा. हजारे मॅडम यांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दुमोरे सरांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जमदाडे मॅडम यांनी तर कार्यक्रमाचा शेवट प्रा. बल्की मॅडम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून केले. कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी प्रा. बांगडे सर, प्रा. सातपुते सर, प्रा. मुसळे मॅडम, प्रा. लालसरे सर, प्रा. बोबाटे सर, प्रा. दुर्योधन सर तसेच भास्कर भाऊ गोंडे आणि विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



