ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे दिनांक 6/10/2026 रोजी अखिल विश्व गायत्री परिवार (शांतीकुंज ) हरिद्वार द्वारा विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, श्री. विक्रमा प्रसाद खुशवा, श्री. रामेश्वरम सिंग, या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. गणेश बांगडे, प्रा. स्वप्निल डुमोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या सामान्य ज्ञान परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



