निमगडेच्या नियुक्तीने शिवसेना कामगार सेनेला मिळणार “नव_वैभव.!
गोंडपिपरी तालुका अध्यक्षपदी वैभव निमगडे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
कामगारांच्या हक्कांसाठी लढा आणि संघटनात्मक बांधणीचा निर्धार
गोंडपिपरी :_ शिवसेना कामगार सेनेच्या गोंडपिपरी तालुका अध्यक्षपदी वैभव निमगडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याच्या नियुक्तीने शिवसेना कामगार सेनेला “नव_वैभव” प्राप्त होणार आहे. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कामगार राज्यमंत्री मा. ॲड. आशीष जयस्वाल यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब, शिवसेना मुख्य सचिव मा. संजय मोरे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार राज्यमंत्री मा. ॲड. आशीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. खासदार व विधानपरिषद आमदार शिवसेना उपनेते कृपाल जी तुमाने यांच्या सोबतीने ही संघटनात्मक वाटचाल सुरू आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारें व शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना जिल्हाध्यक्ष योगेश मुरेकर यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुक्यात कामगार संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या नियुक्तिप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारें, जिल्हाध्यक्ष योगेश मुरेकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित राखणे, त्यांच्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडणे, कामगारांना योग्य न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणे, याला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच करंजी एमआयडीसी परिसरातील कामगारांच्या समस्या, त्यांच्या न्याय्य मागण्या, हक्कांचे संरक्षण आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कामगारांचा सन्मान, कामगारांना न्याय आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे ध्येय समोर ठेवून कामगार सेनेचे संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
वैभव निमगडे यांच्या नियुक्तीमुळे गोंडपिपरी तालुक्यातील कामगार संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्तीबद्दल गोंडपिपरी तालुक्यातील शिवसैनिक व कामगार मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.



