Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

पत्रकाराच्या आत्महत्येने बल्लारपूर शहरात खळबळ – बिल्ट व्यवस्थापन व कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून संपविले जिवन?

सुसाईड नोट मधे नेमके काय? शहरात चर्चेला उधाण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

सायं दैनिक युगाधर्म चे बल्लारपूर येथिल तत्कालीन वार्ताहर व बल्लारपूर पेपर इंडस्ट्री (बिल्ट) ह्या कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत 56 वर्षीय सुधिर लोखंडे ह्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरी कुणीही नसल्याची संधी साधुन आपल्या राहत्या घराच्या मधल्या खोलीत दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी बिल्ट कंपनी व्यवस्थापन व ठेकेदाराच्या त्रास मुळे पत्रकार सुधीर लोखंडे ह्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी सुधिर लोखंडे ह्यांनी मृत्यूपूर्व पत्र लिहून ठेवले असल्याचे बोलल्या जात असून त्यात दोन व्यक्ती आपले मानसिक शोषण करीत असल्याने त्यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्येचा पर्याय स्वीकारत असल्याचे ठाणेदारांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोट मधे नमुद केले असल्याची कुजबुज ऐकायला मिळाले आहे. ह्याबाबतीत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस विभागाने अधिकृतपणे कुठलीही माहिती दिली नाही. मृतक सुधिर लोखंडे ह्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये