गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरी गेलेल्या दोन्ही मोटर सायकली आरोपीकडून जप्त

आरोपीस गून्हयात अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनाक 08/08/2023 रोजी फिर्यादि नामे सचिन गजानन उताने वय 36 वर्ष रा. नांदगाव बोरगाव ता. हिगणघाट याने पोलीस स्टेशन हिगणघाट येथे रिपोर्ट दिली कि, दिनाक 07/08/2023 रोजी चे दूपारी 04.00 ते 04.30 वा. सूमारास फिर्यादि हा त्याची पत्नी व मुलkस सोडणेकरीता बस स्टॅन्ड हिगणघाट येथे त्याचे काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 ने गेला आणि मोटर सायकल बस स्टॅन्ड मधील रसवंती दुकानजवळ उभी करून पत्नीला व मुलाला बस मध्ये बसवून काही वेळाने फिर्यादि गाडीजवळ परत आला असता त्याची मोटर सायकल त्याला दिसली नाही. फिर्यादीने त्याचे मोटर सायकलाचा बस स्टॅण्ड परिसरात व आजुबाजुचे परिसरात शोध घेतला मिळुन आली नाही. फिर्यादिची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 कि. 25,000/रू. हि कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली अश्या फिर्यादिचे तक्रारीवरून अप क्र. 936/23 कलम 379 भादवि अन्वये गून्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर सदर गून्हयातील आरोपी व चोरीस गेलेली मोटर सायकल चा शोध घेणेकामी आम्ही पोस्टाफसह पोस्टे परिसरात असताना मूखबीरकडून माहिती मिळाली कि, एक इसम एकाने मोटर सायकलने आंबेडकर शाळा चौकात फिरत आहे व तो संशयित वाटत आहे अश्या माहितीवरून आम्ही पोस्टाफ व पंचासह आंबेडकर शाळा चौकात जावून त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विलास गूलाब फूलझेले वय 44 वर्ष रा. खूरसापार ता. समूद्रपूर ह.मू. काजी वार्ड हिगणघाट असे सांगून अप क्र. 936/23 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 ही बस स्टॅन्ड हिगणघाट येथील रसवंती समोरून दिनाक 07/08/2023 रोजी चे दूपारी 04.00 ते 04.30 वा. सूमारास चोरून नेल्याचे सांगितले वरून पंचासमश आरोपीकडून काळया रंगाची बजाज प्लॅटीना कंपनीची मोटर सायकल क्र. एम एच 32 एन 5535 कि. 25,000 रू. जप्त करण्यात आली.

त्यानंतर सदर आरोपीस सखोल विचारपूस केली असता आरोपीने अप क्र. 824/23 कलम 379 भादवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची हिरो कंपनीची पँशन प्रो मोटर सायकल क्र. एमएच 32 एएन 9262 कि. 30,000 रू. व अप क्र. 791/23 कलम 379 भादंवि मधील चोरीस गेलेली काळया रंगाची हिरो होण्डा कंपनीची स्प्लेन्डर मोटर सायकल क्र. एमएच 32 के 2271 कि. 7,000 रू. ची चोरून नेल्याचे सांगितलेवरून सदर दोन्ही मोटर सायकली आरोपीकडून पंचासमश पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून आरोपीस गून्हयात अटक करण्यात आली.
वर नमूद तिन्ही गून्हयातील चोरीस गेलेल्या तिन्ही मोटर सायकली आरोपीकडून जप्त करून पोलीस स्टेशन हिगणघाट येथील गून्हे प्रगटीकरण पथकाने सदरची कारवाई केली.

सदरची कार्यवाही श्री. नुरूल हसन पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. सागर कवडे अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. रोशन पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी हिगणघाट यांचे मार्गदर्शनात श्री. मारोती मुळूक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे निर्देशनानूसार गून्हे प्रगटीकरण पथकाचे पोहवा/प्रविण देशमूख, पोना/नरेंद्र आरेकर, सूनिल मळणकर पोकाँ/सागर सांगोले व विजय हारनूर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये