अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा पथका कडुन अल्पवयीन मुलीस अपहरण करुन पळवुन नेणाऱ्या आरोपीस अटक
अल्पवयीन मुलीची सुटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वडनेर येथे फिर्यादी नामे श्री. देवराव भगवान कराळे, वय ४५ वर्षे, रा. सिंदीगी ता कळमनुरी, जि. हिंगोली, यांनी दिनांक १०/१२/२०२५ रोजी तकार दिली की, ते श्री. संजयराव देवतळे रा. येरणगाव, हिंगणघाट जि. वर्धा यांचे शेतात कापुस वेचण्याच्या कामाकरीता त्यांचे परीवारासह आले होते. दिनांक १०/१२/२०२५ रोजी ते त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे उपचारा करीता सेवाग्राम दवाखाण्यात गेले व त्यांची पत्नी ही त्यांचे अल्पवयीन मुलीसह शेतमालकाचे शेतात काम करण्यास गेले होते. सायंकाळी ०५/०० वा दरम्याण फिर्यादी हे घरी परत आले असता त्यांना त्यांची पत्नी यांनी सांगीतले की, ते मुलीसह शेतात काम करीत असतांना दुपारी ०२/०० वा. दरम्याण त्यांची अल्पवयीलन मुलगी ही जेवण करण्या करीता शेतातील झाडा कडे गेली परंतु भरपुर वेळ होवुनही में परत आली नाही व तीचा शोध घेतला असता ते मिळुन आली नाही असे सांगीतले तसेच शेतात काम करणारा वाल्मीक मोरेश्वर ढोबळे, रा. कारेगाव ता. जि. यवतमाळ हा सुध्दा शेतात दिसुन आला नाही असे सांगीतले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांचे अल्पवयीन मुलीचा व शेतात काम करणारा वाल्मीक मोरेश्वर ढोबळे, रा. कारेगाव ता. जि. यवतमाळ यांचा गावात व आजूबाजूला शोध घेतला असता ते मिळुन न आल्याने तिला पळवुन नेल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी दिनांक १७/१२/२०२५ रोजी पोलीस स्टेशन वडनेर येथे तकार दिल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद असुन गुन्हयांचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, वर्धा कडे हस्तांतरीत करण्यात आला होता.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, वर्धा नी सदर गुन्हयाचा तपास अत्यंत बारकाईने व काटेकोर पणे करून गुन्हयातील अल्पवयीन मुलगी व आरोपी नामे वाल्मीक मोरेश्वर ढोबळे, वय २९ वर्षे, रा. कारेगाव ता. जि. यवतमाळ यांचा गुप्त माहितेये आधारे शोध घेत असता आरोपी हा मौजा किन्ही ता. जि. यवतमाळ येथे आल्याबाबत माहीती मिळल्याने सदर माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी एक पथक तयार करुन सदर ठिकाणी जावुन त्यांचा शोध घेतला असता माहीती प्रमाणे आरोपी व पिडीत एकाच ठिकाणी मिळुन आले. आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सांगितले की, ते ज्याशेतात काम करीत होता तेथे अल्पपवयीन पिडीत सुध्दा काम करीत असल्याने तीचे सोबत ओळख झाली व तिला आपण सोबत पळून जावुन लग्न कर असे सांगुन तिला शेतात काम करीत असतांना दि. १०/१२/२०२५ थे दुपारी ०२.०० वा दरम्यान पळवुन घेवुन जावुन एसटी बसने राळेगाव, यवतमाळ, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, पुणे येथे राहुन त्याचे जवळील पैसे संपल्याने ते यवतमाळ येथे परत आले व मौजा किन्ही ता. जि. यवतमाळ येथे मागील एक महीण्या पासुन ग्रामपंचायत कार्यालयाचे कचरा गाडीवर कचरा जमा करण्याचे काम करीत असल्याचे सांगीतले. आरोपी व पिडीत यांना ताब्यात घेवुन पुढील तपास कामी पोलीस स्टेशन वडनेर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे वर्धा यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलीस अंमलदार अमर लाखे, संजयसिंग सुर्यवंशी, चंद्रकांत बुरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे, सर्व नेमणूक अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांनी केली.



